Ad will apear here
Next
सब घोडे बारा टक्के! - अभिवाचन : वैभव मांगले


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे अभिनेते वैभव मांगले यांनी...
........
जितकी डोकी तितकी मते 
जितकी शिते तितकी भुते;
कोणी मवाळ कोणी जहाल 
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढिले कोणी घट्ट; 
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा 
तुम्ही पेरा तुम्ही कापा
जुन्या आशा नवा चंग 
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? 
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्यामध्ये 
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के 
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी 
जिकडे सत्य तिकडे गोळी;
जिकडे टक्के तिकडे टोळी
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; 
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!
 
सब घोडे! चंदी कमी; 
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; 
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा 
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; 
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; 
सब घोडे बारा टक्के!
- विंदा करंदीकर

(‘विंदां’बद्दलचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘विंदां’ची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZMUCJ
Similar Posts
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
विंदांची ‘पिशी मावशी’ कविता आणि मतकरींची कथा : अभिवाचन - तनुजा रहाणे ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’ हा कवी विंदा करंदीकरांचा गाजलेला कवितासंग्रह. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तनुजा रहाणे यांनी त्या कवितासंग्रहातील एक कविता, तसेच रत्नाकर मतकरी यांची ‘ऐक, टोले पडताहेत’ ही कथा सादर केली आहे
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो
स्वातंत्र्यदेवीची विनवणी : कुसुमाग्रजांची कविता - अभिवाचन - डॉ. प्रतिमा जगताप ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिलेली कविता. त्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला नसल्याने या विनवणीची आजही खूप गरज आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language